Friday, December 13 2024 11:54 am

छत्तीसगडच्या मतदार यादीत समाविष्ट मतदारांना १७ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

मुंबई, 9: भारत निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या सहपत्रानुसार महाराष्ट्र शासनाद्वारे छत्तीसगड राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गोंदिया व गडचिरोली) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे छत्तीसगड राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत. अशा मतदारांना शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

मध्यप्रदेश राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे मध्य प्रदेश राज्यातील मतदारयादीमध्ये समाविष्ट असलेल्या मतदारांना शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणा राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे तेलंगणा राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मतदारांना गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय राहील. याविषयी शासनाने अधिसूचना निर्गमित केली आहे.