Tuesday, April 23 2019 9:36 pm

चोरट्यानी पळवले कारमधील पिस्तूल आणि रोकड लंपास   

ठाणे -: कारचे मालक बँकेत तर, चालक पाणी पिण्यासाठी गेल्याची संधी साधून एक चोरट्याने कारच्या उघड्या दरवाजावाटे गाडीतील 5 जिवंत काडतुसांसह कानपुरी बनावटीचे पिस्तुल आणि 20 हजारांची रोकडची बँग घेवून धूम ठोकली.ही घटना कापूरबावडी परिसरातील हायस्ट्रीट मॉलनजीक बुधवारी दुपारी घडली.याप्रकरणी,कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   ठाणे कॅसलमिल येथे राहणारे कुणाल काजारीया (38) हे नोकरदार आहेत.कुणाल बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हायस्ट्रीट मॉलमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेत काही कामा निमित्त गेले होते.यावेळी त्यांनी त्यांची कार रस्त्याच्या कडेला पार्क केली होती.त्यांचा कारचालक कार जवळच असल्याने कुणाल यांनी कारचा दरवाजा लॉक केला नाही.दरम्यान,बँकेतील त्यांचे काम पूर्ण करून कुणाल कार जवळ परतले असता त्यांना कारजवळ चालक दिसला नाही.तेव्हा, कारची तपासणी केली असता,कारमधील मागच्या सीटवर ठेवलेली बॅग त्यांना दिसून आली नाही.त्यांनी कारचालकास याबाबत विचारणा केली असता तो पाणी पिण्यास गेल्याचे त्याने सांगितले.याचदरम्यान,चोरट्यांनी संधी साधली.या बॅगेत 20 हजाराची रोकड,एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे, पॅनकार्ड, आधारकार्ड असा मुद्देमाल होता.चोरीस गेलेल्या पिस्तुलची किंमत 50 हजार इतकी होती अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.