Tuesday, November 19 2019 4:01 am
ताजी बातमी

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच लंपास केले

बीड –  एटीएम फोडून पैसे चोरी केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत परंतु चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच लंपास केले.  बीड बायपासच्या  मोठी नागरी वसाहत असलेल्या ठिकाणी  बायपासवरील दत्त मंदिरासमोर एसबीआय बँकेचे   एटीएम सेंटर आहे. सेंटरवर २ एटीएम मशिन्स आहेत, मात्र येथे सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्यांनी हात साफ केला आहे. चोरट्यायां रोकड लुटण्यासाठी चक्क एक मशीनच चोरून नेल्याचे शनिवारी सकाळी समोर आले . एटीएममध्ये जवळपास २५ लाखाची रोकड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार काल दुपारीच मशीनमध्ये रक्कम जमा करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षकमधूकर सावंत आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देउन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला हे एटीएम नेण्यासाठी मोठ्या चारचाकी वाहणाचा वापर करण्यात आला असावा आणि चोरट्यांची संख्या अधिक असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे औरंगाबाद शहरातील एटीएम चोरीला जाण्याची घटना प्रथमच घडली .पुंडलिकनगर ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.