Monday, April 6 2020 2:58 pm

चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या भावाला १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा

ठाणे : आपल्याच चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या सख्ख्या चुलत भावाला ठाणे  पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी न्यायालयात सादर साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरीत मंगळवारी दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
     पीडित मुलगी हि आपल्या काकाच्या नवीमुंबई सानपाडा येथील घरी राहत होती. तिची आई मूळगावी वर्धा येथे राहत होती. पीडिता मात्र शिक्षणासाठी आपल्या काकाच्या घरी राहत होती. ती नवीमुंबईच्या एका प्रसिद्ध शाळेत शिक्षण घेत होती. सप्टेंबर,२०१७ मध्ये काकाचा मुलगा आणि पीडितेच्या चुलतभाव हा तिच्याशी गैरवर्तन करीत होता. मुलीने सादर घटना घरी सांगितली नव्हती. दरम्यान आक्टोंबर महिन्यात शाळेला सुटटी पडली होती. त्यावेळी मुलीवर आरोपीने जबरदस्ती केली. त्यानंतर अनेकदा तिच्यावर अत्याचार केला होता. काकाच्या घरी राहत असलयाने त्यांच्या उपकार आहेत. त्यांच्याच मुलाच्या विरोधात असा घाणेरडा आरोप कसा करायचा या विचारातून मुलीने कुणाचं याबाबत वाच्चता केली नव्हती. काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखू लागल्याचे पीडितेने  तिच्या मैत्रिणीला सांगितले. मैत्रिणीने याबाबत वर्गाच्या शिक्षिकेला सांगितले. शिक्षिकेने पीडित मुलाला बोलावून विचारणा केल्यानंतर पीडित मुलीने तिच्यावर घडलेल्या प्रकारची हकीकत शिक्षिकेला सांगितली. अन चुलत भावाच्या अत्याचाराचा पर्दाफाश झाला. सादर प्रकरणी शिक्षिकेने २०१८ मध्ये आरोपीच्या विरोधात संपदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि प्रकरण न्यायदानासाठी न्यायालयात प्रविष्ट होते. सादर प्रकरणाची अंतिम सुनावणी  ठाणे पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयात सुरु होती. या प्रकरणात शिक्षिका, पीडित, तिची मैत्रीण आणि डॉक्टरांची साक्ष हि महत्वपूर्ण ठरली. न्यायमूर्ती शिरभाते यांनी भादंवि ३७६(२)(एन) या कामानुसार आरोपीला दहा वर्षाचा कारावास आणि पाच हजाराचा दंड तर भादंवि ३५४ नुसार ५ वर्षाचा कारावास अशी शिक्षा मंगळवारी  ठोठावली.