Friday, May 24 2019 7:37 am

चुनाभट्टीत लिफ्टवरून तोल जाऊन मॅकेनिकचा मृत्यू

मुंबई :-चुनाभट्टी येथे सोमवारी लिफ्ट चे दुरुस्तीच्या वेळी तोल जाऊन खाली पडल्याने मॅकेनिकचा मृत्यू झाला. केतन भैरात असे या मॅकेनिकचे नाव असून तो ठाणे येथे राहणारा आहे.

सायंकाळी चारच्या सुमारास  चुनाभट्टीच्या स्वदेशी मिल टॉवरमध्ये सोमवारी लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. केतन लिफ्टच्या वरच्या बाजूला काम करत होता तर त्याचे इतर सहकारी दुसरीकडे काम करीत होते. तोल गेल्याने केतन खाली पडला आणि खाली असलेला लोखंडी रॉड त्याच्या शरीरात घुसला. काहीतरी पडल्याचा आवाज झाल्याने इतरांनी धाव घेतली आणि जखमी अवस्थेतील केतनला रुग्णलयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिस अधिक तपास करीत आहेत.