Thursday, June 20 2019 3:12 pm

चीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती

बीजिंग :भारताचा शेजारील देश चीनने रस्त्यावरील वीजेचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी एक चांगली शक्कल लढवली आहे.इलेक्ट्रोनिक वस्तू बनवण्यासाठी चीन संपूर्ण जगापासून एक पाउल पुढे असतानाच आता स्ट्रीट लाईट हद्दपार करण्यासाठी चीनने चक्क तीन कृत्रिम चंद्र बनवण्याची तयारी केली आहे. 2020 पर्यंत चीन तीन आर्टिफिशियल मून अर्थात मानवनिर्मित चंद्र लाँच करणार आहेचीनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतची माहिती देणाऱया एका दैनिकाने हे वृत्त दिले आहे.