Friday, April 19 2019 11:48 pm

चिमुकलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या नरधमाला मनसेने पत्रकार परिषद चोपलं

ठाणे : ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत नराधमाला  मनसेने  मनसे स्टाईलने चांगलाच चोप दिला आहे. लहान मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला मनसेने पकडून ठाण्यात सोमवारी पत्रकार परिषदेत हजर केलं. मनसेने पत्रकार परिषदेतच   नराधमाला   चोप दिला. तसेच आरोपीने आतापर्यंत तीन लहान मुलींशी अशाप्रकराचे गैरवर्तन केल्याचं ही कबूल केलं आहे.

        या प्रकऱणातील  आरोपीचं नावजगदीश रॉय वय  53 वर्षीय  असून तो मूळचा बिहारचा आहे. याने  अल्पवयीन मुलीसोबत  अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.या अश्लील चाळे करणाऱ्या पीडित अल्पवयीन परिसरातील बागेत खेळत असताना हा   विकृत नराधमाने  तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. या प्रकाराचा व्हिडिओ तेथे उपस्‍थिती असणाऱ्या एका नागरिकाने काढला होता. हा व्हिडीओ मनसे ठाणे जिल्हा अध्यक्षांच्या हाती लागताच त्यांनी या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला  सोमवारी ताब्यात घेतले. त्यानंतर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन भर पत्रकांर  परिषदेतच त्याला चांगलाच चोप दिला. या वेळीच पोलिस पत्रकार परिषदेत पोहचल्यानंतर या आरोपीला  पोलिसांच्या हवाली करण्यात आले.  अशा नराधम वृत्तीच्या परप्रांतीय लोकांमुळे अनिष्ट प्रवृत्ती वाढत आहेत. त्यास वेळीच रोखले गेले पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसेने  व्यक्त केली आहे . याप्रकरणाचा  पुढील  तपास  पोलीस  करीत  आहेत.