Tuesday, November 19 2019 3:06 am
ताजी बातमी

चार दिवस दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा जोरदार आगमन

ठाणे : गेल्या चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा ठाण्यात जोरदार सुरुवात केली. जुलै महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारपासून ठाण्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या,त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकारमण्याचे थोडे हाल झाले तर पावसामुळे ठाण्यात काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
        मुंबई, ठाणेसह उपनगरात तसेच ठाणे जिल्यात पावसाने चांगलेच झोडपले.गेले चार दिवस गायब झालेल्या पावसाने हजेरी लावून उखड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाल्याने वातावरणात सुखद गारवा पाहायला मिळाला.