Sunday, September 15 2019 11:50 am

चांद्रयान२चा केवळ एका दिवसात चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश

श्रीहरीकोटा : चांद्रयान २ प्रक्षेपणाच्या महिन्याभरानंतर आज चांद्रयान २ ने दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी केवळ १२२८ सेकंदांमध्ये पहिल्या कक्षेतून दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला.  चंद्राच्या ४ कक्षा असून यापैकी पहिल्या कक्षेत मंगळवारी सकाळी चांद्रयान २ने प्रवेश केला होता. तत्पूर्वी पृथ्वीची कक्षा सोडल्यानंतर मी लवकरच चंद्रावर पोहोचेल असा संदेश चांद्रयानने इस्रोला दिला होता. त्यानंतर एकाच दिवसात चंद्राची पहिला कक्षा ओलांडत दुसऱ्या कक्षेत चांद्रयान२ ने प्रवेश केला आहे.२८ ऑगस्टला चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत चांद्रयान २ प्रवेश करणार असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.  चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे हे यान अनियंत्रित होऊन कुठे धडकू नये म्हणून त्याचा वेगही कमी करण्यात आला आहे. १०.९८ किमी प्रतिसेकंदावरून १.९८ किमी प्रतिसेकंदापर्यंत त्याचा वेग कमी करण्यात आला आहे. चांद्रयानचा यापुढील प्रवास सुरळीतपणे पार पडल्यास ७ सप्टेंबरला चांद्रयान२ चंद्रावर उतरेल. चांद्रयान २नंतर एक अंतराळवीर अवकाशात पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.