Tuesday, June 2 2020 4:49 am

घोडबंदर पट्ट्यात सुशिक्षित उमेदवार म्हणून संजय केळकर यांनाच पसंती

ठाणे :  प्रचारामध्ये सर्वात आधी आघाडी घेतलेल्या ठाणे विधानसभा मतदार संघातील उमेदवार संजय केळकर यांनी सोमवारी संध्याकाळी घोडबंदर पट्ट्यातील अनेक मोठ्या गृहसंकुलांना भेट दिली आहे. नागरी वस्ती समजल्या जाणाऱ्या या पट्ट्यात सुशिक्षित उमेदवार म्हणून केळकर यांनाच पाठिंबा देणार असल्याचे इथल्या मतदारांनी जाहीर केले आहे. या भेटीदरम्यान नागरिकांशी काही विषयांवर चर्चा देखील केली तसेच या पट्ट्यात एमएमआरडीए तसेच अन्य प्राधिकरणाची कामे देखील सुरु असल्याने त्यामुळे निर्माण झालेल्या काही समस्या देखील केळकर यांनी जाऊन घेतल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे .
जुन्या ठाण्यासोबतच ठाणे विधानसभा मतदार संघात घोडबंदरचा देखील काही भाग येतो. गेल्या काही वर्षांमध्ये घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली असल्याने या ठिकाणी नागरी वस्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे . विशेष करून या ठिकाणी राहायला आलेला वर्ग हा मुंबईमध्ये कामाला जाणारा असून सुशिक्षित आणि उच्चभ्रू वर्ग म्हणून या पट्ट्यातील मतदारांकडे पहिले जाते. त्यामुळे इथल्या मतदार देखील जो उमेदवार सुशिक्षित असेल आणि त्यांना परिसरातील समस्यांची जाण असेल अशाच उमेदवाराला इथले मतदार निवडणूक देत असल्याने गेल्या विधानसभेला देखील या पट्ट्यातील मतदारांनी संजय केळकर यांना पसंती दिली होती. सतत संपर्कात राहणारा नेता म्हणून देखील संजय केळकर यांची ओळख असल्याने या पट्यात ते संपर्कात असतातच मात्र सोमवारी संध्याकाळी देखील त्यांनी या पट्ट्यातील अनेक बड्या गृहसंकुलांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
घोडबंदर पट्ट्यातील फेज१,फेज २,फेज ५, हायलँड पार्क,कल्पवृक्ष, कोलशेत,प्राईड रेसिडेन्सी,लक्सरारिया,तुलसीधाम, वसंत विहार,अशा अनेक गृहसंकुलांना भेट देऊन या गृहसंकलातील नागरिकांशी संवाद साधला . या ठिकाणी २५ ते ३० हजारांच्या घरात मतदार असून जवळपास सुशिक्षित उमेदवार म्हणून संजय केळकर यांनाच आपली पसंती असल्याचे त्यांनी सांगितले . विशेष म्हणजे केळकर यांना निवडणून देण्यासाठी इतर गृहसंकुलातील नागरिकांना देखील आवाहन केले जाणार असून यासाठी या पट्ट्यातील मतदारच पुढाकार घेणार असल्याचे इथल्या नागरिकांनी सांगितले . नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने केळकर यांचे काम करण्याची तयारी दर्शवली असल्याने त्यांचा या पट्ट्यातील प्रचार देखील आणखी सोपा झाला आहे .

नवरात्रोत्सवांना दिली भेट –
समोवारी  नवरात्रोत्सवांच्या शेवटच्या दिवशी त्यांनी या मतदार संघात येत असलेल्या अनेक नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत . नौपाडा येथील ब्राम्हण सोसायटी,चिखलवाडी भास्कर कॉलनी,हिंदू जागृती नवरात्र उत्सव, जगदंबा आई प्रतिष्ठान विष्णू नगर,कॅस्टेल मिल नवरात्र उत्सव मंडळ,गोकुळ नगर,ओपन हाऊस,राबोडी,उथळसर,विष्णूनगर, वृंदावन,अशा अनेक नवरात्रोत्सवांना भेट देऊन संजय केळकर यांनी त्यांचा उत्साह वाढवला. अशा प्रकारे  नवरात्रोत्सवांना भेट देणारे ते पहिले उमेदवार असल्याने या मंडळांनी देखील केळकर यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे .