Sunday, September 15 2019 11:38 am

घरफोडी व सोनसाखळी चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना बेड्या

कल्याण –  घरफोडी, अँटी रॉबरी स्कॉडने चैन स्नॅचिंग करणाऱ्या  ६ अट्टल चोरांच्या  पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. पोलिसांनी घरफोडीचे सुमारे १४ तर अँटी रॉबरी स्कॉडने चैन स्नॅचिंगचे १० गुन्हे उघडकीस आणले असल्याचे  पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या महिन्यात ठाणगेवाडी परिसरात एका मेडकील स्टोअर्स मध्ये चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून  २ मोबाईल आणि रक्कम चोरली. या चोरीचा तपास करत असताना  महात्मा फुले चौक पोलिसांच्या हाती पप्पू सुंदर यादव, आकाश रमेश गोरे, दत्ता पाटील आणि दत्ता माटेकर ही  मंडळी  किराणा दुकान, मेडीकल स्टोअर्स, स्वीट मार्ट, कपड्याचे दुकानांचे शटर उचकटून हे आरोपी चोरी करत असल्याचे त्यांच्या तपासात समोर आले.  या चौघांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात ३, हिललाईनमध्ये ५, विठ्ठलवाडी २, कोळसेवाडी २, मानपाडा आणि नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात २ असे १४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त पानसरे यांनी सांगितले.  त्यांच्याकडून पोलिसांनी २ मोटारसायकलसह २ लाख ४१ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
तसेच दुसऱ्या गुन्ह्यामध्ये परिमंडळ ३ च्या अँटी रॉबरी स्कॉडने २ इराणी आरोपींना अटक केली असून चैन स्नॅचिंगचे ७ आणि वाहन चोरीचे ३ असे १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. काही दिवसांपूर्वी अँटी रॉबरी स्कॉडने आंबिवली येथील इराणी वस्तीतून कासीम अफसर इराणी याला अटक केली. त्याच्या तपासात कासीमने चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली देत या वस्तू विकणाऱ्या फिरोज सरवर इराणीचीही माहिती दिली.
त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाणे २, महात्मा फुले १, कोळसेवाडी २, टिळकनगर १, डोंबिवली १, मुंब्रा १, विठ्ठलवाडी १ आणि खडकपाडा १ असे १० गुन्हे दाखल आहेत. तसेच हा आरोपी ठाणे पोलिसांच्या टॉप २० चैन स्नॅचरच्या यादीतील वॉन्टेड गुन्हेगार असल्याचेही पोलीस उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. मोक्का कायद्यांतर्गत गुन्ह्यामध्ये तो सध्या जामिनावर सुटला असून त्याची आई, २ भाऊ, बहिणीही या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही कारवाई अँटी रॉबरी स्कॉडचे उपनिरीक्षक अविनाश पाळदे, हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक दिपक गडगे, नरेंद्र बागुल, अमोल गोरे, उपेश सावळे, हृषिकेश भालेराव, शिपाई रविंद्र हासे,  चिंतामण कातकडे, सुनील गावित आदींच्या पथकाने केली. या इराणी आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ महागड्या मोटरसायकलही हस्तगत केल्या आहेत.