ठाणे, 18 : जनहित याचिका क्र. 36/2016 मधील मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापराच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारीचे निराकरण करणेसंबंधी समिती गठण करण्यात आली आहे. सदर समितीची बैठक बुधवार दिनांक 24/01/2024 रोजी दुपारी 1.00 वा. मा. आयुक्त कार्यालयाचे सभागृह, दुसरा मजला ठाणे महापालिका भवन, पाचपाखाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, फक्त घरगुती कमी पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी असल्यास त्यांनी त्यांचे लेखी सविस्तर प्रश्न घेऊन समितीच्या बैठकीसमोर उपस्थित रहावे. तक्रारीमध्ये घरगुती पाणी वापराच्या तक्रारींबाबतच माहिती सादर करण्यात यावी, इमारतीकरिता नळसंयोजनावर स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत किंवा नाही., इमारतीमधील एकूण सदनिका व मीटर नोंदीनुसार प्रतिदिन होणारा पाणीपुरवठा याची माहिती असावी. इमारतीमधील अस्तित्वातील नळ संयोजनावर आकार व एकूण नळ संयोजनांची संख्या नमूद करावी. तसेच संकुलास/ इमारती, कुपनलिका /STP PLANT आहे अथवा नाही, संकुल/ इमारतीमधील, कुपनलिका /STP PLANT सुरू आहे अथवा नाही अशी सविस्तर माहिती अर्जात केलेली असावी असे नगरअभियंता, ठाणे महानगरपालिका यांनी कळविले आहे.