Wednesday, February 20 2019 4:44 am

घरगुती वादात मुलाने केला वडीलांचा खून

भंडारा -: घरगुती वादात काठीने बेदम मारहाण करून मुलाने आपल्या वृद्ध पित्याचा खून केल्याची घटना तुमसर तालुक्याच्या पचारा येथे रविवारी रात्री घडली.
तीर्थराज वरकडे (७०) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री शुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. या वादात मुलगा राजू तीर्थराज वरकडे (४५) याने वडिलांला काठीने बेदम मारहाण केली. यातच तीर्थराजचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीर्थराजची पत्नी कमलाबाई यांनी तुमरसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.