Wednesday, February 20 2019 4:57 am

घरगुतीच्या वादात सरपंचनी केली आत्महत्या

रत्नागिरी -: रत्नागिरीमध्ये गावच्या चिपळूण तालुक्यातील रामपूर गावामधील सरपंचने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरा-बायकोच्या भांडणातून बायकोने विष पिऊन तिने आत्महत्या केली. श्रीया रावराणे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे श्रीयां यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता. श्रीया या राष्ट्रवादीकडून रामपूर गावातील सरपंच आहेत. पण श्रीया आणि त्यांच्या पतीमध्ये सतत वाद होत होता. वाढदिवसाच्या रात्रीदेखील श्रीया आणि त्यांच्या पतीमध्ये भांडणं झाली. त्याचाच राग म्हणून त्यांनी विष प्यायलं. रात्री रागाच्या भरात उचललेल्या या पावलामुळे श्रीया यांचा जीव गेला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिकांकडून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून श्रीया यांचा मृतदेह ताब्यात घेतला तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यात श्रेया यांनी विष प्यायल्याने त्यांचा जीव गेल्याचं उघड झालं आहे.दरम्यान, या संदर्भात पोलिसांत प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अद्याप श्रेया यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाचा शोध घेत आहेत.