Saturday, January 18 2025 6:01 am
latest

घड्याळ तेच पण वेळ नवी, निर्धार नवपर्वाचा, अजितपर्वाचा – आनंद परांजपे

राष्ट्वादी काँग्रेसचा ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाची, ठाण्यात विजयाची दिवाळी साजरी !

ठाणे, 7 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसर्‍या क्रमांकाचे सरपंच व ग्रमापंचायत सदस्य, निवडून आले आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. घड्याळ तेच आहे पण वेळ नवीन आहे, ही वेळ अजितदादा पवार यांची आहे. अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाचा महाराष्ट्रातील जनतेने स्वीकार केला आहे. महाराष्ट्रातील जनता अजितदादा पवार यांच्या पाठीमागे ठामपणे उभी असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीत निर्णयाने दाखवून दिले आहे. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली यापुढे प्रत्येक निवडणुकीत विजयासाठी आम्ही जीवाचे रान करु, असे मत ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई गोतपागर म्हणाल्या की, आम्ही सर्व महिला पदाधिकारी अजितदादा पवार साहेब यांच्यामागे भक्कमपणे उभ्या आहोत. तर युवक जिल्हाध्यक्ष नित्यानंद (विरु) वाघमारे यांनी अजितदादांची प्रश्न सोडविण्याची हातोटी विलक्षण आहे यामुळे महाराष्ट्रातील तमाम युवकवर्ग हा अजितदादांबरोबर आहे. आज महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा आहे असा कौल आज आलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालाने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस चा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या दणदणीत यशाचा, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात विजयाची दिवाळी साजरी केली ! यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जि.) मध्यवर्ती कार्यालयात मा. प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, महिला अध्यक्षा सौ. वनिताताई गोतपागर, युवक अध्यक्ष नित्यानंद (विरु) वाघमारे, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील,, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश सुर्यवंशी, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष रिकी मुर्झेलो, ठाणे परिवहन सदस्य नितिन पाटील, मोहसिन शेख, विधानसभा कार्याध्यक्ष निलेश कदम, ब्लॉक अध्यक्ष समिर पेंढारे, वॉर्ड अध्यक्ष संतोष घोणे, दिनेश दळवी, यावेळी महिला विधानसभा अध्यक्षा सौ. अरुणा पेंढारे, सौ. सुवर्णा खिल्लारी, सौ. वंदना खानोलकर, सौ. माया केसरकर, सौ. सुहानी बारणे, सौ. शामल दाभाडे, सौ. शामा भालेराव तसेच युवक पदाधिकारी उमेश दळवी, ऐजास सय्यद, तोफिक शेख, उमेर फारुकी, भागवत भदे, विद्यार्थी पदाधिकारी मयुर कदम, जतीन भोईर, हर्ष चापले, केतन माने, प्रणव घोलप, आदिल, युवती विधानसभा अध्यक्षा झारा शेख या उपस्थित होत्या.