Tuesday, November 19 2019 3:06 am
ताजी बातमी

घंटा-गाड्यांची स्थानिकांना अडचण

कल्याण-: कल्याण पश्‍चिमेतील फडके मैदानात कचर्‍याच्या गाड्या उभ्या केल्या जातात. या मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर अनेक नागरीक सकाळ-संध्याकाळ चालायला येतात. लहान मुले बागडण्यासाठी येतात. खेळाडू मैदानी खेळ खेळतात. परंतु कल्याण शहरातील कचरा उचलणार्‍या गाडया मैदानामध्ये उभ्या केल्या जात असल्याने नागरिकांना अडथळा होण्याबरोबरच या घंटागाड्यांच्या दुर्गंधीचा आणि आवाजाचा त्रास मैदानावर येणार्‍या नागरीकांसह सोसायटीमध्ये राहणार्‍या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पालिकेच्या कचरा वाहून नेणार्‍या घंटागाड्या कल्याण पश्‍चिमेतील वासुदेव बळवत फडके मैदानात उभ्या करून ठेवल्या जातात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेट्रो दौर्‍यानिमित्त अन्यत्र स्थलांतरीत करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निेशास सोडला होता. त्यानंतर पुन्हा आता या गाड्या पुन्हा मैदानात उभ्या करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मैदानात घंटागाड्या पार्किंग करु नयेत अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेनेचे आधारवाडी परिसरातील उपविभागप्रमुख अनिल डेरे यांनी नागरिकाच्या वतीने प्रशासनला दिला आहे.
यामुळे या घंटागाड्या मैदानावरून हटविण्यासाठी स्थानिक नागरिकाकडून वारंवार मागणी केली जात आहे. 18 डिसेंबर रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने येथील पश्‍चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदानाचे रुपडे पालटताना या कचर्‍याच्या गाड्या अन्यत्र हलविण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा ेशास सोडला होता, मात्र कार्यक्रम आटोपताच काही दिवसात पुन्हा या कचर्‍याच्या गाड्या मैदानातच उभ्या केल्या जात आहेत. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या गाड्या तातडीने हटवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी अनिल डेरे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. दरम्यान या गाड्या हटविल्या न गेल्यास आंदोलनाचा इशारा डेरे यांनी प्रशासनाला दिला आहे.