ठाणे, 1 – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा वेळी ग्रामीण भागातील लोकांना शश्वात व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे अशा सूचना मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी उद्घाटन पर भाषणात दिल्या.
ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी व जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख व तालुकास्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, आरोग्य कनिष्ठ अभियंता, गटसमन्वयक, समूह समन्वयक, पाणी गुणवत्ता निरीक्षक आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
सदर कार्यशाळेत श्री. अनिल निचिते यांनी प्रास्ताविक पर भाषणात सध्या स्थितीत ठाणे जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण व विविध प्रकारच्या पाणी नमुने तपासणी सद्यस्थितीत जिल्हा यातील परिस्थिती याबाबत माहिती दिली तसेच अध्यक्षीय भाषणात प्रदीप कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी जलद गतीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेसाठी प्रमुख तांत्रिक मार्गदर्शक म्हणून श्रीम. गायत्री चावरे यांनी विविध प्रकारच्या पाणी नमुने तपासणी बाबत मार्गदर्शन केले. याबाबत प्रामुख्याने पाणी गुणवत्ता सनियंत्रण, सर्वेक्षण, पाणी गुणवत्ता व्यवस्थापन या बाबींवर सखोल माहिती देऊन पावसाचे पाणी कसे दुषित होते. पाणी प्रदूषणाचे प्रकार, ग्रामपंचायत भूमिका, जबाबदारी, लोकांचा सहवास पाणी गुणवत्ता तपासून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची कार्यपद्धती, क्लोरीन पावडर विषयी माहिती, ओ टी चाचणी कशी करण्यात यावी आणि ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी यांचे स्वच्छता सर्वेक्षण का करणे गरजेचे आहे या सर्व बाबींवर त्यांनी प्रत्येकाला सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी प्रत्येकाला पाणी नमुने तपासणी कशा पद्धतीने विहित कालावधीत करणे गरजेचे आहे याचे देखील महत्त्व उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.
याप्रमाणे जिल्हास्तरावरील पाणी गुणवत्ता चिकित्सक श्री. गणेश मिसाळ यांना केंद्र शासनाच्या WQMIS या पोर्टलवरील नळ योजना शाळा अंगणवाडी तसेच पिण्याचे सार्वजनिक स्तोत्र यांचे Sample id FTK किट तपासणीच्या डेटा एन्ट्री ऑनलाईन वर कशा पद्धतीने नोंद करण्यात यावी तसेच Lab मधून पाणी नमुन्याची तपासणी झाल्यानंतर कशा पद्धतीने पहावेत यांच्या बद्दल माहिती सांगण्यात आली.
या कार्यशाळेचे सुत्रसंचालन श्रीम. प्रमिला माळी यांनी केले असून सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले असून कार्यशाळेचे आभार प्रदर्शन अनिल निचिते यांनी केले.