Tuesday, January 19 2021 11:32 pm

गोसीखुर्द प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली. कामाची पाहणी करत काम मार्गी लावण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तानी थांबविला.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे स्वत: गाडीतून खाली उतरले आणि प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, अचानक मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा थांबल्याने सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांची यावेळी तारांबळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा शेतकरी-प्रकल्पग्रस्तानी थांबविला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी गाडी थांबवून उतरून शेतकऱ्यांशी साधला संवाद साधला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. गेली 35 वर्षे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली. हजारो कोटी रुपये खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.