Thursday, June 20 2019 3:55 pm

गोवा व मुंबई येथे झालेल्या जलतरणस्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूंचे वर्चस्व

ठाणे, ता. 6 : नुकत्याच गोवा बांबोलीम बीच येथे एन्डुरो स्पोर्टस गोवा यांनी आयोजित केलेल्या आठव्या गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धेत व आयआयटी, पवई येथे झालेल्या 26  वार्षीक खुल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश असोसिएशनच्या जलतरणपटूंनी वर्चस्व  गाजविले.

     बांबोलीम बीचवर झालेल्या सागरी जलतरण 10‍ किमी स्पर्धेत शुभम पवार यांनी दुसरा क्रमांक पटकावित रौप्यपदक तर मयंक चाफेकर याने तिसरा क्रमांक पटकावित ब्राँझपदक प्राप्त केले. तर 2‍ किमी स्पर्धेत सानिका तापकीर हिने दुसऱ्या क्रमांकासह रौप्यपदक तर यश सोनक याने तिसऱ्या क्रमांकासह ब्राँझपदक पटकाविले. 1 कि.मी स्पर्धेत शुभम पवार याने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक तर जाई जिंगे हिने दुसरा क्रमांक प्राप्त करीत रौप्यपदक पटविले तर ईशा शींदे हिने तिसरा क्रमांकासह ब्राँझ पदक पटकाविले. 250 मीटर स्पर्धेत शुभम पवार याने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक प्राप्त केले.. तर 18 वर्षाखालील गटात यश सोनक याने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक तर ओम जोंधळे यांनी दुसऱ्या क्रमांकासह रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत मानस प्रधान, क्षीतीज हेरवाडे, तनिष्का हेरवाडे, सई डिंगणकर, मुक्ता काळे, सोहम साळुंखे,सिध्दांत पोळ, ऋतुजा पोळ, विजय ओजाळे, वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, कैलास आखाडे, नरेंद्र पवार आदींनी स्पर्धा पूर्ण करीत पदके पटकाविली.

 

आयआयटी पवई स्पर्धेतील स्टारफिशच्या जलतरण पटूंची कामगिरी.

ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारात जय एकबोटे याने आपला वैयक्तीक 1.26.14 विक्रम मोडत 1.12.21 सेकंदात अंतर पूर्ण करीत प्रथम क्रमाकांसह सुवर्णपदक पटकाविले. बटर फलाय या 50 मीटर प्रकारात त्याने प्रथम क्रमाकांसह सुवर्णपदक पटकाविले.  वैयक्तीक मिडले प्रकारात जय एकबोटे यांनी स्वत:चाच 2.46.66 सेकंद हा विक्रम मोडीत काढीत  2.34.45 सेकंदात प्रथम क्रमाकांसह सुवर्णपदक पटकाविले. बटर फलाय 100 मीटर प्रकारातही त्यानी स्वत:चाच 1.16 सेकंद हा ‍विक्रम मोडत 1.04.08 सेकंदात अंतर पार करुन प्रथम क्रमाकांसह सुवर्णपदक पटकाविले. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत त्याने स्वत:चाच 31.67 हा विक्रम मोडीत काढत 31.56 सेकंदात अंतर पार करुन प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले.

आदित्य घाग याने 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात स्वत:चाच 36.5 सेकंद हा विक्रम मोडीत काढत 36.02 सेकंदात अंतर पूर्ण करीत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले. तर बॅकस्ट्रोक 50 मीटर क्रीडाप्रकारात स्वत:चाच 45.67 सेकंद विक्रम मोडीत काढत 44.40 सेकंदात अंतर पार करीत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले.तर ब्रेस्‌ट स्ट्रोक 50 मीटर या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तर परीन पाटील याने ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात तिसरा क्रमांक प्राप्त करीत ब्राँझ पदक पटकाविले. 25 मीटर फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट् स्ट्रोक प्रकारात निष्ठा शेट्टी हिने सुवर्णपदक पटकाविले. तर बटरफलाय या क्रीडाप्रकारात तिने स्व:तचा 28.47 हा विक्रम मोडीत काढत 26.46 सेकंदात अंतर पार करुन प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले. सर्व जलतरणपटूंना प्र्‍शिक्षक कैलास आखाडे, नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.