Wednesday, December 2 2020 5:13 am

गेल्या ४८ तासांत तब्बल २८८ पोलिसांना कोरोनाची बाधा

मुंबई :राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील जवानांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या २४ तासांत २८८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.

आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलातील १६६६ पोलिस जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे १६ पोलिस जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला तरी रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. तसंच पोलिस दलातील रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखईल खूप चांगलं आहे.

आतापर्यंत ४७८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये ३५ पोलीस अधिकारी आणि ४३८ पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.