Tuesday, July 23 2019 1:56 am

गॅस गळतीने लागलेल्या आगीत कुटुंबातील तीन मुलांसह पाच जण जखमी.

पिंपरी-चिंचवड-: कासारवाडीत केशव नगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही घटना घडली. त्यांच्या घरातील सिलिंडरमधून रात्रीपासूनच गॅस गळती सुरू होती. सकाळी आठच्या सुमारास स्फोट होऊन घराला आग लागली. सर्व जण झोपेत असतानाच ही आग लागली. त्यामुळे,  तत्काळ घरातून बाहेर पडणं कोणालाही  शक्य झालं नाही. या दुर्घटनेत शोभा बिरादार (वय ३०), गणेश बिरादार (वय ८), शुभम बिरादार (वय ५), देवांश बिरादार (वय ३), विजय जाधव (वय २२) हे जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.