Monday, May 19 2025 11:56 pm

गुरूवारी ठाण्यात पाणी नाही

ठाणे 23 : ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचे स्थलांतर करुन मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम के व्हिला नाला पुलाचे कामासाठी बाधित होत असल्याने करणे आवश्यक आहे. सदर कामे करणेसाठी पाणी पुरवठा विभागामार्फत गुरूवार दि. 25/04/2024 रोजी सकाळी 9.00 ते शुक्रवार दि. 26/04/2024 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणारा पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे.

सदर दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. 1 व 2, के व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्रल जेल परिसर, पोलीस लाईन परिसर व नौपाडा प्रभाग क्षेत्रातील एन.के.टी. कॉलेज परिसर, खारकर आळी, पोलीस हायस्कूलच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहील.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.