ठाणे 12 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उथळसर प्रभागसमिती अंतर्गत सिध्देश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीचा 500 मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बदलणे आवश्यक आहे. सदर जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्याचे काम गुरूवार दिनांक 14/12/2023 रोजी हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतर्फे सिध्देश्वर जलकुंभ, इटरनिटी जलकुंभ, जॉन्सन जलकुंभ, समता नगर जलकुंभ, दोस्ती जलकुंभ, म्हाडा जलकुंभ, विवियाना मॉल व आकृती जलकुंभ अंतर्गत परिसर इ. भागांचा पाणीपुरवठा 12 तास पुर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.