Tuesday, January 21 2025 3:38 am
latest

गीता जैन फडणवीसांच्या भेटीला

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदें यांच्या बंडनंतर आता अपक्षांनी देखील पलटी मारण्यास सुरवात केली आहे.

शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन या काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.गीता जैन यांनी सुमारे अर्धातास फडवीसांशी चर्चा केली. त्या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काही अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा दिला होता. यामध्ये मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा देखील सहभाग आहे. जैन यांनी कालच फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असून भूमिकेबद्दल विचारणा केली. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की पुढील वाटचालीबद्दल जो काही निर्णय असेल तो सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या होत्या.