Monday, April 21 2025 11:16 am
latest

गिरगावातील आगग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई 04 – मुंबई महापालिकेचा संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिम पाहणी दौर्‍यातून वेळ काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव परिसरातील धरम पॅलेस या आगग्रस्त इमारतीला भेट दिली. गिरगांव चौपाटी लगतच्या परिसरात असणाऱ्या या इमारतीला दि. 2 डिसेंबर रोजी रात्री आग लागली होती. या आगीवर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आले होते.

स्वच्छता मोहीम पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांना याची माहिती मिळताच त्यांनी दुर्घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी, डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.