Sunday, November 18 2018 9:41 pm

गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांची शिक्षा

पटियाला : २००३ मध्ये झालेल्या मानवी तस्करी प्रकरणात प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी दोषी ठरवण्यात आले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००३ मध्ये मानवी तस्करी द्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेत पाठवण्यात आले .दलेर मेहंदी आणि त्यांचे बंधू समशेर हे आपल्या म्युझिक टीम सोबत लोकांना परदेशात पठवतात आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना तिकडेच ठेवून येतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ह्याप्रकरणी त्यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दखल करण्यात आला होता. तब्बल १५ वर्षा नंतर त्यांना दोषी साबित केले आहे दलेर मेहंदी ला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले असून त्यांच्यावर ३० प्रकरणी आरोप होते .