Sunday, July 5 2020 8:53 am

गाड्यांच्या काचा फोडून किमती सामान चोरणारे दोन चोरट्याना अटक  

ठाणे : रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने ही सुरक्षित नाहीत. चोरट्यांद्वारे चोरीच्या अनेक घटना ठाणे पोलीस आयुक्तालयासोबत आसपासच्या अनेक शहरात घडल्या आहेत. मात्र रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून कारमधील किमती ऐवज लांबविणाऱ्या दोघं चोरट्याना गुन्हे शाखेच्या युनिट-५ च्या पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्या अटकेने तब्बल ४३ गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश लाभले आहे.
          अटक आरोपी जगन्नाथ रामनाथ सरोज(४६) आणि आरोपी दिनेश रामनाथ कश्यप(३३) रा.नालासोपारा जि-पालघर,यांचा समावेश आहे. शहरात कारच्या काचा फोडून करंटेप आणि इतर मुद्देमाल लांबविणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश मॆल्यानंतर वागळे गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाने खबऱ्यांचे जाळे कमला लावून या दोघा आरोपीना गजाआड केले. त्या दोघांची माहिती घेतल्यानंतर ते कारटेप चोरी करणारे सराईत असलायची माहिती मिळाली. त्यांच्या चौकशीत  वागळे  इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात  आरोपींची दिली. अटक आरोपींच्या अधिक चौकशीत त्यांनी ठाणे शहर. मुंबई शहर,नवीमुंबई, ठाणे ग्रामीण, पुणे शहर, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी ४५ ठिकाणी आरोपीना  चोरीच्या  गुन्ह्यात अटक करण्यात आलेली होती. या दोघा  आरोपीनीथाने शहर आयुक्तालयाच्या हद्दीती कासारवडवली, चिटलसार,कापूरबावडी, वर्तकनगर, वागळे , ठाणेनगर,नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर ठाणे ग्रामीण, मुंबई शहर हद्दीत या दोघांनी २९ गुन्हे कबुली दिली. या दोघं आरोपींनी  केलेल्या ४३ गुन्ह्याची उकल करण्यात अली तर चोरलेल्या कारटेप पैकी १६ किमती कारटेप हस्तगत करण्यात पोलिसांना यश लाभले.