Saturday, September 18 2021 12:08 pm
ताजी बातमी

गणेश नाईकांच्या खंद्या समर्थकावर कोयता हल्ला, हतावर वार झेलल्याने संदीप म्हात्रे बचावले

नवी मुंबई : संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी माजी नगरसेविका आहेत

गणेश नाईकांच्या खंद्या समर्थकावर कोयता हल्ला, हातावर वार झेलल्याने संदीप म्हात्रे बचावले
संदीप म्हात्रे
नवी मुंबई : भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे खंदे समर्थक असलेल्या संदीप म्हात्रे यांच्यावर हल्ला झाला. संदीप म्हात्रे यांच्या नवी मुंबईतील जनसंपर्क कार्यालयात घुसून दोघा जणांनी कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. म्हात्रे यांच्या हाताला जखम झाली असून त्यांच्यावर वाशीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं
संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी माजी नगरसेविका आहेत. नवी मुंबईच्या सेक्टर 6 मधील म्हात्रेंच्या जनसंपर्क कार्यालयात घुसून दोन जणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात संदीप म्हात्रे यांनी हातावर वार झेलला, त्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट

संदीप म्हात्रे यांना उपचारासाठी वाशीतील महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. एका हल्लेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत