Tuesday, December 10 2024 7:41 am

गडचिरोलीत ६५ मतदान केंद्रावर २६७ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

गडचिरोली 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता १२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा ६५ मतदान केंद्रावरील ७२ निवडणूक पथकाच्या २६७ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या ३-एम.आय.- १७ आणि ४-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचविण्यात आले.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पथकांना सुरक्षीतपणे पोहचविण्यात येत आहे .