Tuesday, July 23 2019 2:16 am

खेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे केंद्र शासनाच्या वतीने आम्ही मनापासून आभारी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे-: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मार्गदर्शनाखाली या दुसऱ्या खेलो इंडीया क्रीडा स्पर्धेचे अयोजन करण्यात आले,त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही क्रीडा क्षेत्रासाठी काम करत आहोअसे सांगत त्यांनी या खेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे केंद्र शासनाच्या वतीने आम्ही मनापासून आभारी आहोत,ह्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा जवळजवळ 10 दिवस चालणार आहे तरी या क्रीडा स्पर्धेचे थेट प्रेक्षपण टी.व्ही माध्यमातून होणार आहे, देशभरात ह्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचे सामने पाहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे भारतातील अनेक भागात असलेल्या इतर लहान खेळाडूंना प्रेरणा मिळेल,क्रीडा क्षेत्राचा विकास होईल आणि या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेविषयी व ह्या उपक्रमात कोणत्या योजना आहेत याविषयी प्रचार प्रसार होईल.
या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतून जवळपास १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल जेणेकरून त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेत व इतर आंतरराष्ट्रीय यशस्वी कामगिरी करता येईल,खेळ हा फक्त पुस्तकात शिकता येत नाही,तर त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात कृती करावी लागते, आजचा युवा मजबूत होण्यासाठी युवकांनी मैदानावर खेळलं पाहिजे,शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मैदानवर मेहनत केली पाहिजे याचबरोबर तंदुरुस्त भारत निर्माण कार्यक्रमात युवा पिढीचा वाटा असला पाहिजे या मैदानावर खेळा आणि भारत निर्माण कार्यक्रमात सहभागी व्हा असे आव्हान केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड जी यांनी केले.
या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही पण या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाचा संदेश केंद्राचे क्रीडा सचिव श्री.राहूल भटनागर जी यांनी वाचून दाखविला.याचबरोबर खेलो इंडीयाच्या “जया आणि विजया” या दोन्ही शुभंकरांनी मैदानात फेरी मारून ,कार्यक्रमाच्या ठिकाणी देशभराच्या प्रमुख शहरांची यात्रा करून आलेल्या खेलो इंडीयाची मशाल ज्योत मान्यवरांच्या हाती दिली गेली यावेळी स्वतःकेंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी उपस्थितांना खेळा विषयी व खेळाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली.