ठाणे, 13: रत्नागिरी, खेडच्या धामणी पंचक्रोशीमधील श्रीमान आर जी काते विद्यामंदिरामधील शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘ छावा ‘ हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहिला. छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वाज्वल्य स्वराज्य प्रेम, स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी लावलेली प्राणाची बाजी आणि धर्माबद्दल असलेली जबर निष्ठा हा इतिहास विद्यार्थ्यांना कळावा या हेतूने माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विध्यामंदिर चे चेअरमन आणि मुख्याध्यापक यांचे सहकार्याने जे जुळून आले. विशेष म्हणजे या विद्यामंदिर मधील काही विद्यार्थी पहिल्यांदाच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.
इतिहासात एक ही लढाई न हारलेले, एक ही तह न केलेले, कधीही माघार न घेतलेले एकमेव राजा म्हणचे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपतींची ओळख नवीन पिढीला व्हावी, त्यांचा इतिहास, त्यांचे शौर्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानिर्वानानंतर म्हणजे १६८० ते १६८९ या नऊ वर्षाच्या कालावधीत एकाच वेळी मुघल, इंग्रज, पौर्तुगीज, आदिलशाही, कुबशाही यांच्याशी सामना करून स्वराज्य अबाधित ठेवण्याचे जे आभाळा ऐवढे कार्य छत्रपतीनी केले. ते या पिढीला कळावे हाच माजी विद्यार्थी सेवा संस्थेचा उद्देश होता. या करिता ग्रामीण अध्यक्ष विनोद गोगावले यांचे तिकीट काढण्यापासून ते विध्यार्थ्यांना चित्रपटगृहात बसवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.
…………….