Saturday, April 20 2019 12:03 am

खासदार हिना गावित ची गाडी फोड्णाऱ्या आंदोलकावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची लोकसभेत मागणी

 मुंबई :माझी गाडी फोड्णाऱ्या आंदोलकांवर ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी केली आहे. आज लोकसभेत गावित यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी माझ्या गाडीवर चढून हल्ला करणाऱयांवर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मी आदिवासी खासदार असल्यामुळेच माझ्यावर हा हल्ला करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

मराठा आंदोलकांनी रविवारी खासदार हिना गावित यांच्या गाडीवर चढून थयथयाट केला होता. तसेच गावित यांच्या गाडीची तोडफोडही केली होती. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी खासदार डॉ. हिना गावीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्या होत्या. यावेळी संतप्त आंदोलकांच्या आक्रोशाचा सामना गावित यांना करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. मात्र, आता याप्रकरणी ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉ. हिना गावित यांनी लोकसभेत केली आहे. माझ्या गाडीवर मोठय़ प्रमाणात आंदोलकांनी हल्ला केला. यावेळी गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. मी गाडीतून उतरले नसते, तर माझा जीवही गेला असता, असेही गावित यांनी लोकसभेतील निवेदनात म्हटले.