पुणे,१५ : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे. आग लागल्यानंतर तात्काळ विजवली असून यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार सुप्रिया सुळे आज पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना त्यांच्या साडीने पेट घेतला.