ठाणे, 20 – दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक व रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत सर्व खासदारांच्या आयोजित होणाऱ्या बैठकीत ठाण्यातील रेल्वे प्रवाशांच्या भेडसवणाऱ्या समस्यांचा पाढा वाचून रेल्वेकडून प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सुविधा मागून घेतल्या या बैठकीसाठी खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, मनोज कोटक, हेमंत गोडसे व मध्य रेल्वे महाव्यवस्थापक नरेश लालवानी, एजीएम अलोक सिंग, मुख्य परिचालन प्रबंधक मुकुल जैन, मुख्य वाणिज्य प्रबंधक डी वाय नाईक, मुख्य सुरक्षा आयुक्त अजोय सदानी व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खासदार राजन विचारे यांनी नव्याने आलेले मध्य रेल्वे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांना भारतातील पहिली रेल्वे सुरू झालेल्या ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकाची ओळख पटवून दिली. तसेच मुंबईनंतर ठाणे हे रेल्वे स्थानक प्रवाशांकडून जास्तीत जास्त महसूल मिळवून देणारे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली.
या ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व पश्चिम बाजूस अधिक लोकवस्ती असल्याने या ठाणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होऊ न शकल्याने दररोज ७ ते ८ लाख प्रवासी हे स्थानक पेलु शकत नसल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना दमछाक करावी लागते.
यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान मंजूर झालेल्या नवीन रेल्वे स्थानकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. त्यावर मध्य रेल्वेने स्थानकाच्या कामांसाठी 184.21 कोटी रक्कम व जागेची मालकी रेल्वेला मिळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच खासदार राजन विचारे यांनी गेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे लँड डेव्हलपमेंट या विभागाकडून ठाणे रेल्वे स्थानकाचा होणारा विकास कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या संकल्पनेच्या आराखड्यात रूफ प्लाझा, निर्गमन/येणाऱ्या प्रवाशांना वेगळे करणे, वेटिंग हॉल, लिफ्ट आणि एस्केलेटरची तरतूद, बहुस्तरीय कार पार्किंग, मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट, कनेक्टिव्हिटी आणि इतर जागतिक दर्जाच्या सुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच आरएलडीए कडून आराखडा अंतिम करण्यात येत आहे. डिझाईनचे काम पूर्ण झाल्यावर याचे पुन्हा सादरीकरण करून आपल्या सूचनांचा समावेश त्यामध्ये करण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रवाशांना या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू होणाऱ्या विकास कामांचा त्रास होऊ नये यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्या असे सांगण्यात आले.
त्याचबरोबर कोपरी पूर्व येथे सुरू असलेल्या सॅटिस टू च्या कामांचा आढावा घेऊन सदर काम प्रगतीपथावर सुरू असून RLDA ने SATIS च्या रेखांकनामध्ये काही बदल प्रस्तावित केले आहेत. ज्यासाठी TMC आणि RLDA दोन्ही समन्वय करत आहेत. सध्याचा फूड प्लाझा आधीच बंद करून जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. बुकिंग ऑफिस तात्पुरते पोर्टा केबिन येथे हलवले जाईल. त्याच बरोबर २ एस्केलेटर ३०/०५/२०२३ पर्यंत हलवले जातील. अशी माहिती त्यावेळी देण्यात आली.
*रेल्वे प्रवाशांच्या प्रमुख मागण्या मांडल्या*
*एसी लोकल* – ठाणे – वाशी हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकलची मागणी
*तिकीट खिडकीत वाढ,* तसेच UTS APP द्वारे काढण्यात येणाऱ्या तिकिटची जनजागृतीकरण करणे.
*पादचारी पुल* -कल्याण व मुंबई दिशेस सुरू असलेला पादचारी पूल लवकर मार्गी लावावा.
*सरकते जिने*- लांब पल्ल्यांच्या गाड्यांना ज्या फलाटांवर थांबा आहे त्याठिकाणी सरकते जिने बसविण्याच्या मागणीला मंजुरी.
*शौचालयात वाढ* – वातानुकूलित शौचालय, फलाटवर महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, दिव्यांगांसाठी शौचालयाची व्यवस्था यावर भर देण्याची मागणी.
*पाण्याची सोय* – रेल्वे प्रवाशांसाठी थंडगार शुद्ध पाणी मिळावे अशी मागणी.
*सुरक्षेतेसाठी* – सीसीटीव्ही व पोलिस मनुष्यबळ यांच्यात वाढ करण्याची मागणी तसेच प्रवाशांना तक्रारी नोंदविण्यास GRP हेल्पलाइन क्रमांक १५१२ दर्शविणारे ग्लो साइन बोर्ड लवकरच बसविण्यात येणार आहे.
*फेरीवाला धोरण* – रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांना रोखण्यासाठी धोरण निश्चित करा.
*पार्किंगची व्यवस्था* – दुचाकी व चार चाकी मल्टीलेवल पार्किंग इमारत उभी करा.
*लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा* – बनारस, जौनपूर, आझमगडकडे जाणारी एलटीटी बनारस एक्सप्रेस ट्रेन १२१६७/१२१६८ एलटीटी बनारस एक्सप्रेसला आगमन आणि प्रस्थाना दरम्यान ठाणे स्थानकावर थांबा देण्याची मागणी.
*दिघा रेल्वे स्थानक लवकर सुरू करा- खासदार राजन विचारे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी*
प्रतिनिधी- MUTP-3 च्या ऐरोली कळवा एलिवेटेड या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले असून हा दिघा रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी सुरू करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गीका व कळवा एलिवेटेड स्टेशन काम सुरू करण्यासाठी १०८० झोपड्यांचे पुनर्वसन एम एम आर डी ए व आर अँड आर मार्फत झाल्यानंतर सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु खासदार राजन विचारे यांनी काम सुरू होईपर्यंत या मार्गिकेवर १ लाईनवरून माल डब्यांची गाडी येत असते त्या मार्गिकेचे मजबुती करून करून सकाळी व संध्याकाळी कल्याण – डोंबिवली वरून येणाऱ्या गाड्या थेट नवी मुंबईला सोडण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली.