Tuesday, December 10 2024 8:30 am

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने सुरु झालेले नवीन दिघा रेल्वे स्थानक महिना अखेर पर्यंत सुरू होणार

नवीमुंबई, 13 – ठाणे व कल्याण या दोन लोकसभा क्षेत्राला जोडणारा ऐरोली – कळवा एलिवेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पाला खासदार राजन विचारे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून सन २०१४-१५ पहिल्याच रेल्वे बजेटमध्ये ४२८ कोटीची मंजुरी मिळवली होती. या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबर २०१६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा एलिवेटेड रेल्वे स्थानक व मार्गीकेसाठी १०८० झोपड्यांचे पुनर्वसन करावे लागणार होते परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे जागेचा भूसंपादन सर्वे करण्यासाठी रेल्वेला अडथला येत होता त्यासाठी दि.२०/०६/२०१७ रोजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग व जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन पत्राद्वारे संरक्षण देऊन सर्वे करण्याची मागणी करण्यात आली व सर्वे करून घेतला. सदर प्रकल्प सुरू होण्यास विलंब लागत असल्याने खासदार राजन विचारे यांनी या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन मंजूर झालेला निधी केंद्र सरकारकडे परतू नये म्हणून सदर प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करण्यासाठी एमआरव्हीसीकडे पाठपुरावा करून दिघा रेल्वे स्थानकासाठी जाणारा रस्ता, पाण्याची लाईन, पार्किंग तसेच मल- निसारण लाईन यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेसाठी MIDC सोबत बैठका घेऊन परवानगी मिळवून घेतली व त्याचे दोन वर्षानंतर प्रत्यक्ष जागेवर दिनांक ७ मे २०१८ रोजी दिघा रेल्वे स्थानकाचे कामाचे भूमिपूजन करून स्थानकाचे काम सुरू केले.

*या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे फायदे*

नवी मुंबई शहरात नोकरीनिमित्त कल्याण, डोंबिवली ,अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिक येत असतात या रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात येऊन हार्बर मार्गावरील वाशी लोकल पकडावी लागते त्यामुळे या प्रवाशांचा वेळ ताकद खर्ची पडत असते या प्रवाशांना डायरेक्ट नवी मुंबईमध्ये प्रवेश मिळण्यासाठी हा ऐरोली कळवा एलिव्हेटेड प्रकल्प महत्त्वाच ठरणार आहे तसेच यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार ही कमी होणार आहे त्यामुळे ठाण्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल.
आज या पाहणी दौऱ्यात दिघा रेल्वे स्थानकाचे काम ९५ टक्के पूर्ण झालेले आहे. त्यावेळी एम आर व्ही सी चे मुख्य प्रकल्प अधिकारी बी. के. जहा, उप प्रकल्प अधिकारी चौधरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे सर्व्हे अधिकारी खैरे, नवी मुंबई महापालिकचे कार्यकारी अभियंता सोनावणे, वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त गायकवाड, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, व्दारकानाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर, संतोष घोसाळकर, मिलिंद सुर्यराव, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, विजय माने, उपशहर प्रमुख मंगेश साळवी, सुर्यकांत मढवी, महेश कोटीवाले डी.आर.पाटील, संजय तुरे, विभाग प्रमुख मिलिंद पाटील, चंद्रकांत शेवाळे, शरद घोरपडे, मधुकर राऊत, युवासेना सह सचिव करण मढवी, ऐरोली विधानसभा संघटक चेतन नाईक, ऐरोली शहर अधिकारी राजेश मोरे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष जी.एस.पाटील, मा.शहर प्रमुख मोहन मढवी, माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे व इतर सर्वे शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*नवीन दिघा रेल्वे स्थानकात कसे असणार*

फलाट 1/2 व 3/4
फलाटाची लांबी 270 व रुंदी 12 मीटर
भुयारी मार्ग 5
सरकते जिने 6
लिफ्ट 2
दोन्ही बाजूस पार्किंग व्यवस्था 400+400
दोन्ही बाजूस G+2 इमारत असून त्यामध्ये 6+6 तिकीट खिडकी व कार्यालय
शौचालय 2
पाण्याची सोय (2 वॉटर कुलर फलाट) 1/2 व 3/4