Tuesday, January 19 2021 11:31 pm

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे कोपरी रेल्वे पुलावरील गर्डरला मिळाला मुहूर्त…..

ठाणे:  खासदार राजन विचारे यांनी 18 नोव्हेंबर 2020 रोजी कोपरी पुलाच्या कामाची पाहणी रेल्वे, एम एम आर डी ए व वाहतूक शाखेचे अधिकारी यांच्यासमवेत केली. या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कोपरी पुलाचे गर्डरचे काम डिसेंबर शेवटपर्यंत टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु तांत्रिक अडचणीमुळे रेल्वे ने दिनांक 24 व 25 या दोन दिवसाच्या रात्री गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्याचे आदेश रेल्वेला प्राप्त झाले आहेत
या गर्डर टाकण्याच्या कामासाठी वाहतूक शाखेकडून परवानगी प्राप्त झाली नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून खासदार राजन विचारे यांना कळविण्यात आले होते. खासदार राजन विचारे यांनी तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून या कोपरी पुलाच्या गर्डर कामास आपण परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यांनी सुद्धा या कामाला गती देऊन ती तात्काळ रेल्वेला मिळवून दिली. त्यामध्ये येत्या शनिवारी दिनांक 16 व रविवार दिनांक 17 या दोन दिवशी आनंदनगर येथील भुयारी मार्गावरील 35 मीटरच्या 7 गर्डर काम एम एम आर डी ए मार्फत सुरू होणार आहे. त्यानंतर दिनांक 24 व दिनांक 25 या दोन दिवशीच्या रात्री रेल्वे मार्फत 65 मीटरच्या 7 गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेकडून काही बदल करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती खासदार राजन विचारे यांनी केली आहे.