Monday, March 8 2021 6:14 am

खारकर आळी परिसरात एका मेडीकल दुकानात सापडला जखमी कोल्हा

ठाणे: खारकर आळी परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास एका मेडीकल दुकानात जखमी कोल्हा आढळला.
खारकर आळी येथे महाजनवाडीतील डॉ.शहा यांच्या दवाखान्याच्या बाजूला दवा इंडिया या मेडिकल दुकानात एक जखमी कोल्हा शिरला होता. अंदाजे २ वर्षे वयाचा हा कोल्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जागतिक पशुसंवर्धन संस्थेच्या मदतीने पकडला. कोल्ह्याच्या पायाला दुखापत झाली असल्याने त्याला नॅशनल पार्क, बोरिवली येथे उपचाराकरिता घेवून जाण्यात आले असल्याचं वन विभागानं सांगितलं.