Thursday, November 15 2018 1:35 pm

खंडाळ्याजवळ अपघात 18 ठार, 17 जखमी

सातारा :पुणे बेंगलोर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील   खंबाटकी बोगदा ओलांडून  पुडे पुणयाकडे जात असताना आज मंगळवारी पहाटे एस कॉर्नर येथे ट्रकला भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार सुमारे १७ जण जागीच ठार झाल्याची भीती निर्माण झाली आहे. मृत सर्व विजापूर जिल्ह्यातील कामगार असून अंधार असल्याने नेमकी माहिती समोर येत नाही. दरम्यान , मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी मंगळवारी पहाटे खंबाटकी बोगद्यात पुण्याच्या दिशेने सुमारे ३० कामगार घेऊन ट्रक निघाला होता.
ट्रक एस कॉर्नर येथे आल्यानंतर कठड्याला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना समजल्यावर त्यांनी व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर ट्रकमधील जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू असताना प्राथमिक माहितीनुसार जागीच १३ जणांचा तर उपचारावेळी ४ अशाप्रकारे एकूण १७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.