Thursday, November 21 2019 3:43 am

खंडणीसाठी दीड वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक

ठाणे:- दिवा येेथे राहणाऱ्या मोनूकुमार नंदकिशोर पासी यांच्या दीड वर्षाच्या चिमुरड्याचे खंडणीसाठी त्याच्याच भाऊबंदकीने अपहरण केले. या प्रकरणी आरोपी नागेश पासी याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट १ द्वारे संयुक्तरित्या करण्यात आला. पोलीस पथकाने पालघर जिल्ह्याच्या बोईसर परिसरातून आरोपी नागेश पासी याला अटक करीत बालकाची सुखरूप सुटका केली.

६ जुलै, २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमर्स फिर्यादी यांचा लहान भाऊ अवधेशकुमार व त्याचा मित्र आरोपी नागेश पासी दोघे दीड वर्षाचा आकाश याला फिरण्यास घेऊन गेले. अवधेश याचा मित्र नागेश याने बॅग समोरच्या दुकानात ठेवली असल्याचे सांगत ती घेऊन ये असे सांगून आकाशला ताब्यात घेतले. अवधेशला बॅग मिळाली नाही. दरम्यान नागेश पासी याने मुलाचे अपहरण करून पोबारा केला. मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा संयुक्तरित्या तपास करीत होते. त्याच दरम्यान पोलीस पथकाला अपहरणकर्ता नागेश पासी याने आपल्या मोबाईलवरून १७ जुलै रोजी उत्तरप्रदेश येथे राहणारा चुलत भाऊ लवकुश पासी याला फिर्यादीच्या मुलाच्या सुटकेसाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. गुन्ह्याचा तांत्रिक तपासणी पोलीस करीत होते. आरोपी नागदेश पासी याच्या फोनवर पोलिसांचे लक्ष होते. मात्र खंडणीच्या फोन नंतर पोलीस सतर्क झाले. खबऱ्याच्या माहितीच्या आधारे अपहृत बाळ हे पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे असलयाचे निष्पन्न झाले. मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट १ चे संयुक्त पथक यांनी बोईसर परिसराचा शोध घेत १२ जुलै रोजी आरोपी नागेश रामअगार पासी याला अटक केली. त्याने अपहरण केलेल्या आकाश याची सुखरूप सुटका कार्नाय्त आली. चिमुरडा आकाश याला पालकांच्या तर आरोपी नागेश पासी याला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन कार्नाय्त आले. पुढील तपस मुंब्रा पोलीस करीत आहेत.