Thursday, June 20 2019 3:04 pm

क्रिकेट बेटिंग प्रकरणात प्रोड्युसर संघवी,समीर बुट्टाला पोलिसांचे समन्स

ठाणे :अनेक देशात बेटिंगचा व्यवसाय दाऊदसाठी चालविणाऱ्या बेटिंग डॉन सोनू जालना याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. क्रिकेट बेटिंग संबंधित प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता चौकशीसाठी प्रोड्युसर पराग संघवी आणि समीर बुट्टा याना समन्स पाठविण्यात आला आहे.

अरबाज खान नंतर खंडणी विरोधी पथकाने चित्रपट सुष्टीतील प्रोड्युसर पराग संघवी आणि समीर बुट्टा याना मंगळवारी चौकशीसाठी हजार राहण्याचे समन्स पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अरबाज खान प्रमाणे संघवी आणि बुट्टा यांचाही जबाब खंडणी विरोधी पथक नोंदवून चौकशी करणार आहे. आंतरराष्ट्रीय बेटिंग आणि रवी पुजारी याच्याशी संबंध पाहता पोलीस जालना याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या विचारात असल्याची माहिती हि खंडणी विरोधी पथकाच्या अधिकारी यांनी दिली.