Sunday, September 15 2019 11:39 am

कौशल्य ही यशाची नवी गुरूकिल्ली आहे ! हे वाक्य औरंगाबादच्या पार्थ कोटक याने नुकतेच सिद्ध करून दाखवले.

औरंगाबाद-: पार्थ कोटक याने आपल्या मित्राच्या मदतीने स्वतःसाठी एक बाईक डिझाईन करून स्वतःच ती तयार केली आहे. त्याने आपल्या बाईकला अत्यंत गर्वाने “अॅडलर रायडर’’ असे नाव दिले आहे. ही बाईक पूर्णतः कस्टम-मेड असून टाकाऊ आणि सेकंड हॅण्ड स्पेअर पार्ट्सपासून तयार करण्यात आली आहे. 10 फूट लांब असलेली ही बाईक तयार करण्यासाठी अंदाजे 2 लाख रुपये खर्च आला असून ही केवळ देखाव्यासाठी तयार करण्यात आली आहे. पार्थच्या मित्रपरिवारात सध्या हा चर्चेचा विषय बनला असून सीईडीपी स्कील इन्स्टिट्यूटच्या अन्य ऑटोमोबाईलप्रेमींसाठी हे आकर्षण ठरले आहे.

                                                              

ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्रात कार्यरत होण्यासाठी स्वतःला तयार करण्याच्या हेतूने पार्थ मुंबईत आला. एका वर्षानंतर, सीईडीपीच्या ऑटोमोबाईल टेक्निशियन कोर्सला प्रवेश घेण्याचा त्याचा निर्णय हा त्याच्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय ठरला. सीईडीपीच्या अभ्यासक्रमादरम्यानचे शिक्षण आणि ऑन-जॉब प्रशिक्षण यामुळे पार्थ याने स्वतःची बाईक तयार केली. त्याहीपुढे जाऊन, 12 महिन्यांच्या ऑटोमोबाईल टेक्निशियन कोर्समध्ये पार्थ याला 4 महिने प्रात्यक्षिकांसह थियरी अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तसेच, स्टडी टूर्स, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांचे गेस्ट लेक्चर आणि प्रकल्पांना भेटी देता आल्या. उरलेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत त्याला ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या उत्कृष्ट कंपनीसोबत प्रत्यक्ष काम करतानाच प्रशिक्षण व प्रत्यक्ष अनुभव घेण्याचीही संधी मिळाली.

                                                         

हि बाईक बनवणे हे त्याच्या आजवरच्या प्रवासाइतकेच आव्हानात्मक होते. आपल्या स्वप्नातले हे वाहन तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा नव्हती, हेच त्याच्यापुढचे सर्वात मोठे आव्हान होते. त्यातच, त्याच्या मित्राने त्याची मदत केली आणि आपल्या वडलांच्या वर्कशॉपमध्ये काही जागा व अन्य उपकरणे दिली. या ठिकाणी पार्थने रात्रंदिवस काम केले. 18 महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर, मित्राच्या सहकार्यातून टाकाऊ वस्तूंपासून पार्थने बाईक तयार केली. आपल्या सर्व यशाचे श्रेय पार्थ सीईडीपी इन्स्टिट्यूटला देतो. एक कुशल ऑटोमोबाईल टेक्निशियन म्हणून काम करीत असल्याबद्दल आपण या संस्थेचे ऋणी आहोत, असे पार्थ सांगतो.भविष्यात, आणखी नवीन डिझाईन्स तयार करून भारताला जागतिक पातळीवर नेण्याचा पार्थचा मानस आहे.