Wednesday, November 6 2024 4:15 pm

कोविड काळात मृत्यु पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम व सातव्या वेतन आयोगातील तफावत तातडीने अदा करावी: सुजय पतकी, प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांची आयुक्तांकडे मागणी.

ठाणे 8 -कोविडच्या कठीण काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे योगदान हे अतुलनीय राहिले आहे. या काळात मृत्युमुखी पावलेल्या कर्मचाऱ्यांना आपण कोविड योद्धा असे संबोधले तसेच त्यांचा गौरव देखील केला. ठाणे महापालिकेतील सुमारे 48 सफाई कर्मचारी कोविड आजाराने कर्तव्य बजावीत असताना दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. परंतु यांच्या काही वारसांना अजूनही पगाराची काही रक्कम देणे थकित आहे. ह्या मध्ये बराच काळ उलटून दिरंगाई झाली असल्याने, ती रक्कम तसेच सातव्या वेतन आयोगातील तफावत रक्कम मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने देण्यात यावी. अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता सुजय पतकी यांनी ठाणे महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांना भेटून केली आहे.

माननीय आयुक्तांनी यावर अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने प्रक्रिया करू असे आश्वासन दिले तसेच सदर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. यावेळी मृणाल पेंडसे महाराष्ट्र महिला मोर्चा सचिव, निलेश कोळी फ्रेंड्स ऑफ बीजेपी लोकसभा संयोजक, रक्षा यादव, प्रमोदिनी कांबळे, नताशा सोनकर उपस्थित होते.