Monday, June 17 2019 4:22 am

कोल्हापुर शहराचे पाणीपुरवठा बंद महानगपालिकेने २२ कोटी थकवल्याने कारवाई केली

कोल्हापुर: कोल्हापुर शहराचे पाणीपुरवठा जलसंपदा विभागने बंद केला आहे .कोल्हापुर  महानगरपालिकेने २२ कोटीचे कर थकावल्याने जलसंपदा विभागाने कार्रवाई केल्याचे समझते याप्रकरणी जलसंपदा विभागाने अनेकवेळा कोल्हापुर महानगरपालिकेला नोटिस बजावली होती, मात्रा त्यांनी दुर्लक्ष करून थकित रक्कम अद्यापही भरली न्हवती म्हणून शिंगणापुर पाणी उपसा केंद्रावर जलसंपदा विभागाने कारवाई केली आहे .
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिका पंचगंगा नदीतून पिण्याचे पाणी उपसा करते ह्याच्या मोबददलयात जलसंपदा विभागातर्फे दरमहिन्याला बिल पाठविण्यात येते .मात्र महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाची थकबाकी रक्कम न भरल्याने कोल्हापुर नागरिकांना पाण्याची टंचाई जाणावणार आहे दंड आणि विलंब शुक्ल अशी मिळून २२ कोटीची थकबाकी आहे. ही थकबाकी ५ मार्च पर्यंत भरण्याची नोटिस जलसंपदा विभागानें बजावली होती तरीही रक्कम न भरल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला .