Friday, May 14 2021 1:32 pm
ताजी बातमी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण नवी मुंबई शहरात २९ जून ला पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे

नवी मुंबई : दररोज 200 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शहरात 24 जून रोजी तब्बल 321 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री  नवी मुंबईतील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन 7 दिवसांसाठी असणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला

दिवसभरात तब्बल 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार 853 वर पोहोचला आहे. शहरात दिवसभरात 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण 194 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत नेरुळ, ऐरोली, कोपरखैरने, घणसोली हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, नवी मुंबईत आज दिवसभरात 106 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 3 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली.

नवी मुंबई पाठोपाठ कल्याणमध्ये कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. कल्याणमध्ये दररोज 200 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे अखेर केडीएमसीने कोरोना रोखण्यासाठी एसआरपीएफची तुकडी बोलवली आहे. कल्याण-डोंबिवलीत 15 ते 16 कंटेन्मेंट झोन हे पूर्णपणे सील करण्यात येणार आहेत. या भागात उद्यापासून एसआरपीएफच्या तुकड्या मोठ्या प्रमाणात तैनात होतील.असे ही त्यांनी सांगितले