Tuesday, July 23 2019 2:05 am

कोरेगावात होणार होणार ‘जय भीम’चा जयघोष

कोरेगाव-:  नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवरी २०१८ रोजी सर्व भीम संघटना कोरेगाव येथे  मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद रावण यांना पुण्याजवळच्या भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारीला सभा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मात्र, त्याला अभिवादनासाठी विजयस्तंभ परिसरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

1 जानेवारी 2018 रोजी इथल्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या होत्या. यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय देण्यात आला आहे.

केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भीमा कोरेगाव येतील पेरणे फाटा येथे जाहीर सभा होत असल्याचे रिपाइंतर्फे सांगण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी रिपाइं नेत्यांतर्फे करण्यात आल्याचेही पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.