ठाणे, 20 : ठाण्यातील कोरम मॉल जवळील तारांगण वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरील जुन्या कल्व्हर्टच्या हायवेलगतच्या बाजूस ४ मीटर लांब व ४ मीटर रुंद असे खोदकाम करण्यात येणार आहे. तारांगण वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरील नाला ते हायवेलगतच्या कलव्हर्टपर्यंत पाईप टाकण्यात येणार आहेत. या कामामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी तारांगण वसाहतीच्या गेटजवळ कोरम मॉलकडून नितीन जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना व नितीन जंक्शनकडून सर्व्हिस रोडने कोरम मॉलकडे जाणाऱ्या वाहनांना १९ जानेवारीपासून पुढील २ महिने प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे गरजेचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. ही वाहतूक अधिसूचना दि. १९ जानेवारी २०२३ रोजीपासून २ महिन्यांकरीता अंमलात राहील, असेही त्यांनी कळविले आहे.
प्रवेश बंद – कोरम मॉलकडून नितीन जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना तारांगण वसाहतीच्या गेटजवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने कोरम मॉल ते कॅडबरी जंक्शनकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने किंवा स्लीप रोडने कॅडबरी ब्रिजखालून उजवे वळण घेवून इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद – नितीन जंक्शनकडून सर्व्हिस रोडने कोरम मॉलकडे जाणाऱ्या वाहनांना तारांगण वसाहतीच्या गेटजवळ येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची वाहने नितीन ब्रिज स्लीप रोडने पुढे कोरम मॉल कट येथून डावे वळण घेवून इच्छीत स्थळी जातील. तसेच संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना प्रवेश राहणार आहे.