Thursday, November 15 2018 2:44 pm

कोपर येथील रेल्वे प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट

·         प्रवाशांचा वळसा वाचणार

·         प्रकल्पाचा खर्च १० कोटी रुपये

·         कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचेही रुंदीकरण होणार

·         मुंबई दिशेकडील पादचारी पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात

ठाणे : वाढत्या गर्दीमुळे ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला येत असला तरी क्षमता वाढीचे अनेक प्रकल्पही या मार्गावर हाती घेण्यात आले असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे कोपर येथील रेल्वे प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट मिळणार आहे. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळालेल्या या होम प्लॅटफॉर्मच्या कामाचे भूमिपूजन गुरुवार१ नोव्हेंबर रोजी झाले. त्याचबरोबर अपर कोपरला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या रुंदीकरणालाही मंजुरी मिळाली असून त्याचेही काम सुरू होणार आहे.

ठाण्यापुढील प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ व्हावीयासाठी खा. डॉ. शिंदे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच दिवा आणि ठाकुर्ली स्थानकांचा कायापालट झाला. अंबरनाथ स्थानकाच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळाली आहे. कल्याण येथील रेल्वे यार्डाचे देखील रिमॉडेलिंग होऊन लांब पल्ल्याच्या व उपनगरी गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊन उपनगरी गाड्यांची संख्या वाढणार आहे. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा ते अंबरनाथपर्यंतच्या सर्व स्थानकांवर अवघ्या पाच रुपयांत पिण्याचे शुद्ध थंड पाणी उपलब्ध झाले आहे. तसेचअपघातग्रस्त प्रवाशांसाठी कल्याणडोंबिवली आणि मुंब्रा येथे वैद्यकीय कक्ष सुरू झाले असून कळवा येथील वैद्यकीय कक्षही लवकरच सुरू होत आहे.

याच मालिकेतील आणखी एक बाब म्हणजे ज्या स्थानकांमध्ये होम प्लॅटफॉर्म नाहीतत्या स्थानकांमध्ये होम प्लॅटफॉर्म व्हावेतजेणेकरून प्रवाशांना पादचारी पुलाचा वापर करावा लागणार नाही आणि पादचारी पुलांवरील गर्दीचा ताण कमी होईल,यासाठी खा. डॉ. शिंदे पाठपुरावा करत होते. त्यातूनच ठाकुर्ली येथे असा होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत दाखल देखील झाला. त्यापाठोपाठ अंबरनाथ आणि कोपर स्थानकातही होम प्लॅटफॉर्मला मंजुरी मिळाली असून कोपर स्थानकातील या कामाला गुरुवारपासून सुरुवात देखील झाली. गुरुवारी खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी महापौर विनिता राणेशहरप्रमुख राजेश मोरेसभागृह नेते श्रेयस समेळनगरसेवक रमेश म्हात्रे,विश्वनाथ राणेदीपेश म्हात्रेसंजय पावशेतालुका प्रमुख एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.

या कामासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून हा प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत दाखल व्हावायासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुंबई दिशेकडील पादचारी पुलाच्या कामालाही लवकरच सुरुवात

सध्या कोपर स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुल नसल्यामुळे पूर्वेला राहाणारे प्रवासी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडून ये जा करतात. त्यामुळे मुंबई दिशेला पादचारी पुल व्हावायासाठीही पाठपुरावा सुरू होता. या पादचारी पुलालाही मंजुरी मिळून त्याचेही काम लवकरच सुरू होईलअसे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.