Monday, October 26 2020 4:23 pm

कोपरी स्टेशन परिसरातील वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास मूक मोर्चा काढू

ठाणे : ठाणे पूर्व येथील कोपरी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय सुरू असून याचा नाहक त्रास स्थानिक महिलांना होत आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलां खुलेआम रस्त्यावर दिसून येत असल्याने कोणतीही भीती या महिलांच्या मनात उरली नाही. या व्यवसायामुळे सामान्य घरातील महिलांकडे देखील वेगळ्या नजरेने बघितले जात आहे. येत्या 8 दिवसात कोपरी येथील वेश्याव्यवसाय बंद झाला नाही तर पोलीस स्टेशनवर महिलांचा मुख मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला.

कोपरी येथील स्टेशन परिसरात लॉकडाऊन नंतर मोठ्या प्रमाणावर काही महिला बाहेरून येऊन देहविक्री करत आहेत. याठिकाणी सर्रासपणे महिला उभ्या राहत असतात, आणि याच कारणामुळे सुशिक्षित स्थानिक महिलांना खाली मान घालून रस्त्यावरून जावे लागते. याबाबत स्थनिक नगरसेवक यांच्याकडे तक्रारी प्राप्त होत होत्या. हीच बाब लक्षात घेता स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली, यावर तोडगा निघावा यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
दरम्यान नगरसेवक भरत चव्हाण यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन कोपरी पोलिसांना निवेदन दिले. येत्या 8 दिवसात येथील वेश्याव्यवसाय बंद झाला नाही तर महिलांचा मुख मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला.