Friday, May 24 2019 8:21 am

कोकण पदवीधर प्रचाराच्या तोफा थंडावल्या , भाजप- सेनेमध्ये आरोप प्रत्यारोप

ठाणे : कोकण पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असुन मुख्यता लढत असलेल्या भाजप,सेना आणि राष्टवादी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून रोजगार, शिक्षण, पर्यटनाला चालना आदी प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. दरम्यान शिवसेनेच्या मोरे यांनी भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे याच्यावर जोरदार टीका केली. राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक आंदोलने केली, त्यासाठी पोलिसांच्या केसेसही अंगावर घेतल्या, मात्र वडलांच्या पुण्याईवर केवळ दरबारी राजकारण करणाऱ्यांना या केसेसचे महत्त्व काय कळणार, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही ज्यावेळी जनतेच्या प्रश्नावर आंदोलने करत होतो, त्यावेळी विरोधक दहशतवाद्यांच्या घरी जाऊन त्यांना समर्थन देत होते, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, जे आपल्या वडलांना विसरले, पक्षाला विसरले, ते मतदारांचे काय होणार, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
    दरम्यान शेवटच्या क्षणी रडीचा डाव खेळण्याचा नेहमीचीच सवय असल्याची टीका राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेनं पालघर मध्ये तेच केले असुन मतदारांना चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करीत असून पदवीधर मतदार निवडणुकीत शिवसेनेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा टोला यावेळी चव्हाण यांनी लगावला. दहशतवाद्यांच्या घरी जाऊन त्यांना समर्थन देण्याचे काम ह्याचाच आमदारांनी केले असुन मोरे यांच्यावर शिक्षण मंडळामध्ये भ्रस्टाचार केल्याचे ठपका ठेवला असल्याचे सांगत शिवसेनेनं केलेल्या आरोपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी खंडन केले.