Monday, January 27 2020 10:36 pm

कोकणातील व्यावसायिक उद्दोजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयन्त करणार -प्रवीण दरेकर

ठाणे :मालवणी महोत्सवातील कोकणातील व्यावसायिक उद्दोजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटपाचे काम भविष्यात हाती घेणार असल्याचे मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले. ठाण्यातील कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने शिवाई नगर येथे मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी दरेकर यांनी उत्सवाला भेट दिली. तेव्हा ते बोलत होते.

कोकणातून मुंबई,ठाण्यात उद्योजक व्यावसायिक येत असतात.मालवणी कोकणी उत्सवाच्या माध्यमातून व्यवसाय करतात.अश्या उद्योजकांना आर्थिक दिलासा देण्याचे काम आपण केले पाहिजे. संपूर्ण ताकत या उद्योजकांना मागे लावली पाहिजे असे मत देखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी मांडले.

कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने ठाण्यातील शिवाईनगर येथे 4 ते 13 जानेवारी या दहा दिवसांच्या कालावधीत मालवणी महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवात खवय्यांसाठी मालवणी खाद्य पदार्थांची रेलचेल राहणार आहे.   मालवणी महोत्सवाचे यंदाचे 21 वे वर्ष असुन या मालवणी महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे 70 स्टोल उभारण्यात आले आहेत. विविध मालवणी चवीचे खाद्यपदार्थ चाखताचाखता मनोरंजनाच्या मेजवानीचाही लाभ खवय्यांना घेता येणार आहे. या मालवणी महोत्सवासाठी प्रवेश  मोफत ठेवण्यात आल्याचे कोकण ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष आयोजक सीताराम राणे यांनी सांगितले.